श्रीकृष्ण गोपी खेळ
150.
श्रीकृष्ण गोपी खेळ
वनामध्ये कांगे आलांती सकळ । विनोदेम गोपाळ ह्मणताती ॥१॥
निशींमाजी व्याघ्र फिरताती रानी । जावे सक-ळांनी घरा आता ॥२॥
ऐकोनिया ऐसे कठीण वचन । चालिले जीवन नेत्रींहूनी ॥३॥
वेणुनाद दूत धाडिला आह्मांसी । आलिया म्हणसी जावे आता ॥४॥
शहाणा चतुर आहेसी नेटका । वैकुंठना-यका विचारावे ॥५॥
कामाग्नीने कृष्ण धरिती सकल । मांडियेला खेळ मन्मथाचा ॥६॥
एक एक नारी एक एक कृष्ण । करावया पूर्ण इच्छा त्यांची ॥७॥
प्रकृतीसी ऐसा भुलला गोविंद । करिती आनंद नामा म्हणे ॥८॥
