वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

श्रीअनंता मधुसूदना ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072942 · अभंग क्र. ४०४७

4047.
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥
सकळ देवाधिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महानंदा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥धृपद॥
चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥
कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥
अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥
तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणी । हेचि करीतसे विनवणी । भवबंधनी सोडवावे ॥५॥

अर्थ :
हे श्री अनंता मधुसूदना तुझी नाभी कमलासारखी असलेल्या नारायणा. संपूर्ण जगामध्ये तू व्यापक असणा-या जनार्दना, आनंदघना, अविनाशा, हे जी केशवा महाराज तुम्ही सर्व देवांचे आदिदेव आहात तुम्ही कृपाळू आहात, देवा तू भक्तांना तुझा अपरोक्ष अनुभव आणून देणारा आहेस आणि भक्तांना आनंद देणारा आहेस त्यामुळे तू सर्वात मोठा आहेस तू सर्व काळ शुध्द असून सहजस्वरुप धारण करणारा आहेस. हातामध्ये सुदर्शन चक्र धारण करणा-या विश्वामध्ये भरुन उरणा-या तुझ्या ध्वजेवर गरुडाचे चिन्ह असून तू करुण करणारा आहेस. देवा तुला सहस्त्र हात आणि सहस्त्र पाय आहेत क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर तू शयन करतोस. हे कमलासारखे नयन असणा-या लक्ष्मीपते कामिनीला देखील मोहीत करण्यासारखी तुझी मदनमूर्ती आहे. हे भवसमुद्र तारुन नेणा-या शेष किंवा वामनाच्या अवतारामध्ये पृथ्वी मस्तकावर धारण करणा-या तीनही भुवन जिंकणा-या देवा भक्तांसाठी तू छोटासी वामन अवतार धारण केलास, हे सगुणरुपा निर्गु

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग