वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

माझा तव खुंटला उपाव

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072929 · अभंग क्र. ४०४८

4048.
माझा तव खुंटला उपाव । जेणे तुझे आतुडती पाव । करू भक्ती तरि नाही भाव । नाही हाती जीव कवणेविशी ॥१॥
धर्म करू तरि नाही चित्त । दान देऊ तरि नाही वित्त । नेणे पुजो ब्राम्हण अतीत । नाही भूतदया पोटा हाती ॥२॥
नेणे गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥
तीर्थ करू तरि मन नये सवे । व्रत करू तरि विधि नेणे स्वभावे । देव जवळी आहे म्हणो मजसवे । तरि आपपरावे न वंचे ॥४॥
म्हणोनि झालो शरणागत । तुझा दास मी अंकित । यास काही न लगे संचित । झालो निश्चिंत तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
देवा मला तुझी प्राप्ती होईल असे जे साधन आहे ते साधनच करण्याविषयी माझे उपाय खुंटले आहेत. कारण देवा तुझी भक्ती करण्यास जावा तर माझ्यामध्ये शुध्द भक्तिभाव नाही आणि माझा जीवही माझ्या स्वाधीन नाही. धर्म करु पाहावे तर माझे चित्त स्थिर नाही आणि दान देऊ पाहावे तर माझ्याकडे वित्त म्हणजे धन नाही. देवा माझ्या हाताने कधी ब्राम्हण आणि अतिथींची पूजा घडत नाही माझ्या अंत:करणामध्ये भूतदया म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर दया करण्याचे येत नाही आणि माझ्या हातून भूतदया घडतही नाही. गुरुचे दास्यत्व कसे करावे, संतसेवा कशी करावी, संतसंगती कशी घडेल आणि जप, तप, अनुष्ठान हे काहीही मी जाणत नाही. माझ्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होत नाही आणि एकातामध्ये वनात जाऊन हरीची सेवा देखील माझ्याच्याने घडत नाही इंद्रियांचे दमन देखील माझ्याच्याने होत नाही. तीर्थयात्रा करावी तर मन बरोबर येत नाही आणि व्रताचरण करावे तर त्याचा विधी शास्त्रोक्त विधी मला माहित नाही. देव माझ्याजवळच

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग