तुजपासी फार असे चतुर
477.
तुजपासी फार असे चतुराई ।
आम्हापासी काइ उणी आहे ॥१॥
तुम्ही आम्ही एक एकाचि गावीचे ।
विसरलो त्याचे फळ मागे ॥२॥
तुझे ठायी ऐसे नसावे सर्वथा ।
थोरपण वृथा वागविसी ॥३॥
बहेणि म्हणे मूळ आम्हा तो न सांडे ।
नका होऊ वेडे पांडुरंगा ॥४॥
