वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 5. श्रीकृष्ण जन्माचे अभंग

सातवा जो गर्भ योगमाय

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073282 · अभंग क्र. ७

7.
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्र्चर्य करीत मनामाजी ॥१॥
रोहीणी उदरी नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणे यादव पळाले । ब्राम्हण राहिले अरण्यांत ॥३॥
नाही कोणा सुख तळमळ मानसी । वधील दुष्टासी कोण आता ॥४॥
विश्‍वाचा जो आत्मा कळले तयाल । दावितसे लीला संभूतीची ॥५॥
अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसी । स्थापिल धर्मासी नामा म्हणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग