वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

खेळी खेळता वो विकळ स

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089792 · अभंग क्र. २१३

213.
खेळी खेळता वो विकळ सुंदरा ।
जालि आठविता नंदाच्या कुमारा ।
स्वेद कंपखेद दाटला शरिरा ।
जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥
धरा आवरुनी म्हणति वो साजणी ।
धीर न धरत पडिलि धरणी ।
येकी सांगति वो जालि झाडपणी ।
वेगी आणा आता पंचाक्षरी गुणीवो ॥२॥
जातो प्राण वो येताति लहरे ।
येकी म्हणति वो डंखिली विखारे ।
आंग तापले वो येतु आसे शियारे ।
येकि म्हणति वो मोडसियेचा भरे वो ॥३॥
येकि म्हणति गे लागले दैवत ।
कुळिचे दारुण वो नेदि करु मात ।
घाला गोंधळ वो विनवा समस्त ।
ठेवा आण भाक करुनि येकचित्त वो ॥४॥
ऐसा मिळाला वो भेंवताला पाळा ।
होती चुकुर येकी रडताती बाळा ।
पाजा वोखदे वो वांचवा वेल्हाळा ।
नका उशिर गे धावा उतावेळा वो ॥५॥
मग ते येकांतिची सांगे सखियासी ।
नका बाहेरि वो फुटो कोणापाशी ।
आणा नंदाचा नंदनु येकांतासी ।
‍ निळया स्वामीची हे भावना निश्चयेसी वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग