वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

अर्चूनिया पुंडलिका ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088477 · अभंग क्र. ४६४

464.
अर्चूनिया पुंडलिका ।
विश्वाव्यापका राहविले ॥१॥
थोर उपकार केला लोका ।
भक्ता भविका तारियेले ॥२॥
आणूनिया वैकुंठवासी ।
सुगुण रुपेंसी भेटविला ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हादिक ।
देवही सकळिक मानवले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग