हनुमानजन्म - अभंग ३४
3411.
हनुमानजन्म - अभंग ३४११ ते ३४१३
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापे जाण घारी जाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥
श्रूंगी पायसपात्र दिधले वसिष्ठा हाती । त्वरे करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चिती । दिधले राणी हाती तिघी तीस ॥४॥
कैकेई रुसली तेथे विघ्न जाले । घारीनें ते नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढे जाली कथा श्रवण करा ॥६॥
