वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

मेल्यावरी मोक्ष संसा

🙏 3. संत तुकाराम · ABH-078162 · अभंग क्र. २११०

2110.
मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हा ॥१॥
वागवीत संदेह राहो कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥धृपद॥
गाणे गीत आम्हा नाचणे आनंदे । प्रेम कोठे भेदे अंगा येते ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसता तू अनंत सानुकुळ ॥३॥

अर्थ :
देवा आम्ही मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार की आमचा संसार संबंध तसाच राहणार हे आम्ही कसे समजून घ्यावे? अहो देवा अशा प्रकारचा संदेह मी तरी मनात कुठपर्यंत वागवीत राहू. मग असे संदेह मनात राहिले तर तुमच्या सेवकाचे काय महत्त्व राहिले? देवा आम्हाला तर तुझे गीत गावून तुझ्या आनंदात नाचणे आवडते परंतु जर आमच्या अंगामध्ये भेद राहिला तर त्या भेदा ने प्रेम कोठे उत्पन्न होईल काय ते तुम्ही सांगा? तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जर अनुकूल नसेल तर आम्हाला कितीही दृष्टांत सांगितले तरीही ते व्यर्थच ठरणार आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग