एकाएकी आता असावेसे व
2111.
एकाएकी आता असावेसे वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥
वाजवूनि तोंड घातलो बाहेरी । कुल्प करुनी दारी माजी वसा ॥धृपद॥
उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवे हुद्देदार चेष्टाविला ॥२॥
तुका म्हणे भय होते तो चि वरी । होती काही उरी स्वामिसेवा ॥३॥
अर्थ :
देवा तुम्हाला आपण दोघेही एकटे असावे असेच वाटते तर मग तुम्ही हे द्वैतच निर्माण करण्याचे खोटे चाळे का केले? देवा तुम्ही वेदाचे तोंड वाजवून तुम्ही आम्हाला स्वरूपस्थितीच्या बाहेर घालविले परंतु तुम्ही आज्ञावरणाचे कुलूप घालून आत मध्ये लपून बसला आहात. देवा तुमच्या ठिकाणी स्वरूपस्थितीचा प्रकाश असूनही तुम्ही जाणून-बुजून अंधार करून ठेवला आणि आमच्यासाठी वेद आणि संत हे मुद्देदार नेमुन ठेवले. तुकाराम महाराज म्हणतात देवा जोपर्यंत तुमच्यात व आमच्यात सेवक व स्वामी असा भेद होता तोपर्यंत आम्हाला तुमचे भय होते आता तुम्ही आणि आम्ही एक झालो त्यामुळे तुम्हाला भिण्याचे काहीच कारण नाही.
