वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

पावया लुब्ध झाल्या प

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074898 · अभंग क्र. १७१

171.
पावया लुब्ध झाल्या पावळा ।
गाई परे वळा रे कान्हा ॥
विसरल्या चार विसरल्या पार ।
तल्लीन साचार कृष्णमूर्ती ॥
पाणिया निघाल्या गाई चरती कळंबा ठायी ।
हांकितसे लवलाही संवगडा ॥
ज्ञानदेवी गाई हाकितु पावे सोई ।
हरिनाम दोही सत्राविये ॥

अर्थ :
कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गाई मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गाई कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गाईंना सवंगडी हाकारत होते. हरिनामाच्या गाई हाकल्याने त्या सवंगड्यांना सतरावी जीवन कळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग