वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 285. जनार्धनाची आरती ४००१

जनार्धनाची आरती ४००१

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087887 · अभंग क्र. ४००१

4001.
जनार्धनाची आरती ४००१

जयदेव जयदेव जय जगदंबा । परमार्थे आरती भावार्थे आरती अभिन्न भावना ॥धृ.॥ अवलोकिता जन न दिसे जर्नादन । भिन्नभिन्न कैच । दावी अभिन्न । अनेक एकत्वदिसे परिपुर्ण । थकली मन बुध्दी कैंचा । गुण अवगुण ॥१॥ ज्योतीचिया ज्योती उजळली दीप्ती । तेणेंतेजें झाली सतेज आरती । पहाणे ते पहाणेपणस्थिती । नुरेचि 4 वेगळा देहा नवी तृप्ती ॥२॥ उजळिता उजळेना । उजळावयालागी । वेगळेपणकैंचे नुरेंची भागी । आंगची आर्पिला आंगिचा आंगी । जीवशिवपण गेले हारपोनी वेगी॥३॥पाठ ना पोटअवघा निघोट । सर्वांगी देखणा सर्वा वरिष्ठ । विष्टना निष्ट गुप्त ना प्रगट । ओहं सोहं सगट भरियेलाघोट ॥४॥ सर्वदा दिसे परी नाकळे मना । जे जेंदिसे ते ते दर्शन जाणा । अभाव भावनेसी हरलीभावना । अभिन्नव आरती एका जनार्दना ॥५॥
---------------------------------------------
संत एकनाथ म. गाथा समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग