आले मना तव मारिले बळ
15.
आले मना तव मारिले बळकट ।
बांधोनिया मोट टाकियेली ॥१॥
हिरंभट म्हणे व्हा तुम्ही बाहेरी ।
हा दिसे हत्यारी चांडाळ की ॥२॥
मग मातापिता हिरंभटालागी ।
प्रार्थुनिया वेगी स्थिर केले ॥३॥
म्हणती कृपा करा आजि दिसभरी ।
प्रातःकाळि दुरी ठाव पाहो ॥४॥
तयावरी वत्स गाय दोघे जण ।
न खाती की तृण जळेसहित ॥५॥
देखोनी वत्सासी गाईची वृत्तांत ।
मोट तो सोडित तये वेळी ॥६॥
आणिले जवळि गाई वत्सापासी ।
हुंबरली जैसी पुत्र माता ॥७॥
आपण देखिले वत्स आणि गाय ।
म्हणे प्राण जाय तरी बरा ॥८॥
बहेणि म्हणे तया तृण पाणी पाजी ।
न घेती ते माझी थोर माया ॥९॥
