वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कलियुगी घोर पाप हे ख

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076201 · अभंग क्र. ५४०

540.
कलियुगी घोर पाप हे खतेले ।
स्वधर्म सांडिले चहूवर्णी ॥१॥
बळी पै मोहाचे माहात्म्य बा जेथे ।
गुरूशिष्य तेथे एक होती ॥२॥
धनाचिया चाडे पुराणपठण ।
वेदांतश्रवणी धनालागी ॥३॥
दाटोनिया एक देती उपदेश ।
धरोनिया सोस कांचनाचा ॥४॥
वेदाज्ञेकरोनी न करिती स्वाहित ।
नव्हती अतीत देहाहूनी ॥५॥
एक स्त्रियांलागी उपदेश करिती ।
अंतरी भुलती रतिसुखा ॥६॥
बहेणी म्हणे नका घेऊ त्यांचे नाम ।
मुखी स्मरा राम सर्वकाळ ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग