गायीवत्सगोपाळ केलीसे
101.
गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागता क्षण परीक्षिती ॥१॥
पूर्ववत सर्व न्यून कांही नाही । करीत आपाही मनामाजी ॥२॥
इच्छामात्रे करी ब्रह्मांडाच्या कोटी । त्यासी काय गोष्टी अपूर्व हे ॥३॥
सायंकाळी गेले गोकुळाभीतरी । आपुलाल्या परी घरी सर्व ॥४॥
ब्रह्मादिका ज्याचा नकळेची पार । मानवा विचार न कळे कांही ॥५॥
ऐसा हा समर्थ नामयाचा धनी । वंदी पायवणी सदाशीव ॥६॥
