वैष्णवांचा मेळ सकळ म
29.
वैष्णवांचा मेळ सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥१॥
हरिनाम विनट हरि उच्चारीत । सप्रेमे डुल्लत भक्तजन ॥२॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई गोविंदी तल्लीनता ॥३॥
निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुल्लत सनकादीक ॥४॥
अर्थ:
पंढरीत सर्व संतांनी एकत्र येऊन देव विठ्ठल व देवाचे नाम यांना एकत्र करुन काला केला.सप्रेमाने घेतलेल्या हरिनामाने डुल्लत असलेले भक्त त्या नामात तल्लीन झाले. हरिनामात तल्लिन झालेले सोपानदेव व ज्ञानदेव काल्याच्या दिंडीत मुक्ताई सह चालताना तल्लीन झाले आहेत.निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वतः, विसोबा खेचर, परसा भागवत, सनक, सनंदन, सनातन, व सनत्कुमार हे ह्या आनंदात डुल्लत आहेत.
