वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

मिळोनि बारा सोळा घोक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084452 · अभंग क्र. ५६७

567.
मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥
रुप ते सांवळे सुंदर सोभलें । गळा मिरवलें तुळशीहार ॥२॥
मुगुट कुंडले वैजयंती माळ । कौस्तुभ झळाळ हृदयावरी ॥३॥
शंख चक्र करी दोन्ही ते मिरवले । सुंदर शोभले वाळरुप ॥४॥
एका जनार्दनी हृदयी श्रीवत्सलांछन । वागवी भूषण भक्तांसाठी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग