वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

निर्गुण गुणासी आले |

🙏 4. संत नामदेव · ABH-082648 · अभंग क्र. १७५९

1759.
निर्गुण गुणासी आले | परब्रह्म ठसविले |भक्त पुंडलिका लाधले | गौप्य केले प्रगट ॥१॥
सेवा सेवा ब्रह्मरस | विठ्ठल पंढरीनिवास ॥ धृ० ॥
निर्गुण गुणाकार | मूर्ति सांवळी सुंदर |सकलहि गुणांचे माहेर | मुक्तिपेठ पंढरी ॥२॥
धन्य धन्य भीमातट | चंद्रभागा हे निकट |जेथे विठ्ठलवीर प्रगट | नाम गर्जती हरिदास ॥३॥
धन्य धन्य पद्माळे | सभराभरित आनंद जळे |स्नान केलिया निर्मळे | कोटि कुळे उद्धरती ॥४॥
धन्य धन्य 'माणदेश | विठ्ठले केला रहिवास |नामा म्हणे विष्णुदास | देई उल्हास भक्तीचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग