वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

पंढरी माहेरी विठ्ठल

🙏 4. संत नामदेव · ABH-082624 · अभंग क्र. १७६०

1760.
पंढरी माहेरी विठ्ठल माउलिये | जावोनि हे बोली सांगिजो जी ॥१॥
संसारगांवी लेकी असे तुमची | चिता का तियेची सांडियेली ॥२॥
सासुरवासिणी पाहातुसे वाट | सांगिजो का कष्ट माउलिये ॥३॥
अव्हेरू माझा करी अविचारु भावा | आशा तृष्णा जावा बहिणी का ॥४॥
एकलिये माते खेदती बहुते | तंव एकांते तुमते आठवीत ॥५॥
चांडाळी हे सासु नष्ट पै पापिणी | कांही केल्या धणी पुरो नेदी ॥६॥
रात्रंदिवस नाही कामाचा शेवट | जीवित्वाचा वीट येतु असे ॥७॥
सखी सांगातिणी तिसी नाही भेट | अज्ञान है पोटी वाढतसे ॥८॥
सुखाचे डोहळे दुःख की नावडे | ऐसे केंवि घडे तुजविण |॥९॥
रखुमाई माता पांडुरंग पिता | मी त्याची दुहिता म्हणे नामा ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग