पाहुनिया पंढरीपुर ।
390.
पाहुनिया पंढरीपुर । मना आनंद अपार ॥१॥
करिता चंद्रभागें स्नान । मना होय समाधान ॥२॥
जाता पुंडलीकाचे भेटी । न माय आनंद त्या पोटी ॥३॥
पाहता रखुमादेवीवर । मन होय हर्षनिर्भर ॥४॥
पाहा गोपाळपूर वेणूनाद । एका जनार्दनी परमानंद ॥५॥
