नित्य घडे चंद्रभागे
391.
नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥
त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥
उजवें घेता राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥
संतांसवें कीर्तन करिता । आनंदे टाळी वाजविता ॥४॥
मोक्ष जोडोनिया हात । तयाची वाट तो पहात ॥५॥
धन्य पंढरीचा संग । एक जनार्दनी अभंग ॥६॥
