आणिक दैवते देती काय
7.
आणिक दैवते देती काय बापुडी । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपता सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥
