आम्हांपासी काय मागसी
1435.
आम्हांपासी काय मागसी तू देवा | नाही भक्तिभाव भांडवल ॥१॥
भांडवल गांठी देखोनि साचार | सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥
घेसी सोनिया पोहे मुठीभर | हिडसावल्या कर नामा म्हणे ॥३॥