भावेंविण भक्ति कशाने
1434.
भावेंविण भक्ति कशाने हो करी | माया मोह वैरी देहामाजी ॥१॥
तुझे नाम दिव्य रस जिन्हे स्वाद | नाश काम क्रोध करिती माझा ॥२॥
जे जे वस्तुसि नयनी मी पाहे | त्या त्या धांवताहे विषयी मन ॥३॥
नामा म्हणे थोर उबगलो संसारी | पुढा काळ वैरी ग्रासू पाहे ॥४॥
