वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

जनार्दनी माय जनार्दन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084662 · अभंग क्र. १८३८

1838.
जनार्दनी माय जनार्दन बाप । जनार्दन ताप निवारिती ॥१॥
जनार्दन बंधु जनार्दन भगिनी । जनार्दन निर्वाणी मजलागी ॥२॥
जनार्दन सखा जनार्दन चुलता । जनार्दन तत्त्वता प्राण माझा ॥३॥
जनार्दन सुहृद जनार्दन मित्र । पवित्रापवित्र जनार्दन ॥४॥
जनार्दन जन जनार्दन विजन । माझे तनमन जनार्दन ॥५॥
जनार्दन ऐश्वर्य जनार्दन धन । मज निरंजन जनार्दन ॥६॥
जनार्दन जीव जनार्दन भाव । जनार्दन शिव मजलागी ॥७॥
जनार्दन पिंड जनार्दन ब्रह्मांड । जनार्दन अखंड परब्रह्मा ॥८॥
एका जनार्दन वृत्ति होय लीन । जालासे तल्लीन परब्रह्मी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग