वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

जनार्दनी शोभित जन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084611 · अभंग क्र. १८३९

1839.
जनार्दनी शोभित जन । जनार्दने साचार ज्ञान । जनार्दने आकळे मन । ध्याता ध्येय ध्यान जनार्दन ॥१॥
गाई जनार्दन मुखकमळी । जनार्दनु नयनी न्याहाळी । ह्रुदयकमळीं । जनार्दनु ॥२॥
जनार्दने बोलिला वेदु । जनार्दने बुद्धिसे बोधु । जनार्दने तोडिला भेदु । परमानदु जनार्दनु ॥३॥
जनार्दने ज्ञानदृष्टी । जनार्दने पावन सृष्टी । जनार्दने संतुष्ट पुष्टी । निजभावें भेटी जनार्दने ॥४॥
जनार्दने सर्व ज्ञान डोळसु । जनार्दन स्वयंप्रकाशु । जनार्दने देहबुद्धि निरासु । परमहंसु जनार्दन ॥५॥
जनारने अज्ञानभंग । जनार्दने नित्य नवा रंग । जनार्दने वैष्णवसंग । वोडगे रंग जनार्दने ॥६॥
जनार्दने सुख होय सुखा । जनार्दन पाठीराखा । जनार्दने तारिला एका । आम्हा निजसखा जनार्दन ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग