यारे नाचो प्रेमानंदे
419.
यारे नाचो प्रेमानंदें|विठ्ठल नामाचिया छंदे ॥१॥
जाऊ म्हणती पंढरीवाटे |कळिकाळा भय वाटे ॥२॥
चंद्रभागे घडले स्नान |यमलोकी पडली हान॥३॥
जाली पुंडलिका भेटी|पूर्वज आनंदलै वैकुठी ॥४॥
राउळासी जाता |जाली जीवाची मुक्तता ॥५॥
विष्णुदास नामा म्हणे |आता नाही येणे जाणे ॥६॥
