मृगजळाच्या जळी चाळिस
213.
मृगजळाच्या जळी चाळिसी जळचरे ।
कैंचे जळ तेथे कोठे मत्स्य रे ॥
नाथिलीच खटपट करिसील किती ।
गगनींची सुमने तुरंबिसी मस्तकी ॥
वांझेचिया सुता रचशील मारे ।
कैचापुत्र तेथे कायी संव्हरे ॥
कोल्हैरीचे वारू आणिशिल बसावया ।
कैचा राऊत कोणा जिकिशील रया ।
ऐशी नाथिलीचि नाटके आचरसी किती ।
ज्ञानदेव म्हणे सहजे निवृत्ति ॥
अर्थ :
मृगजळात जळचर चाळुन घेण्यास जातात पण त्या पाण्यात काय मासे असतात का? आकाशाच्या फुलांना वास कुठे किंवा ती डोक्यात कशी घालावी? ही वाऊगी खटपट नाही का? वांझेच्या मुलास मारण्यास मारेकरी आणले पण तो मुलगाच नाही मग ते कोणाला मारतील. सैनिकाला बसण्यास कुंभाराने बनवलेला घोडा आणला तर तो युध्द कसे लढेल? ही अशी किती खटपट करशील नाटके करशील त्याने काही मिळणार नाही त्या पेक्षा श्री गुरु निवृत्तीनाथांना शरण जा असे माऊली सांगतात.
