भावाचिये बळे होऊनि ल
2136.
भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥
न म्हणे यातिकुळ ते सुशीळ । उत्तम चांडाळ हो का कोण्ही ॥२॥
अट्टाहास्यें करिता नामाचा उच्चार । उतरी पैलपार भवनदीचा ॥३॥
एका जनार्दनी भक्तांची आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥
