कथाश्रवणे विरक्ति जो
1082.
कथाश्रवणे विरक्ति जोडे ।
निजशांती वाढे उल्हासे ॥१॥
कथाश्रवणे परमानंद ।
प्रगटे स्वानंद निज ह्रदयी ॥२॥
कथाश्रवणे उपाधी तुटे ।
भवाब्धी आटे नि:शेष ॥३॥
निळा म्हणे कथाश्रवणे ।
हरती मरणे जन्म जरा ॥४॥
1082.
कथाश्रवणे विरक्ति जोडे ।
निजशांती वाढे उल्हासे ॥१॥
कथाश्रवणे परमानंद ।
प्रगटे स्वानंद निज ह्रदयी ॥२॥
कथाश्रवणे उपाधी तुटे ।
भवाब्धी आटे नि:शेष ॥३॥
निळा म्हणे कथाश्रवणे ।
हरती मरणे जन्म जरा ॥४॥