वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

सोंगे छंदे काही । दे

🙏 3. संत तुकाराम · ABH-079142 · अभंग क्र. १०१२

1012.
सोंगे छंदे काही । देव जोडे ऐसे नाही ॥१॥
सारा अवघे गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥धृपद॥
शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥
तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥

अर्थ :
परमार्थामध्ये कोणत्याही प्रकारचे सोंग केले तर देव प्राप्त होतो असे नाही. हे लोकांनो तुम्ही तुमच्या डोळ्यावरील अज्ञानाचे पडळ बाजूला सारा. तुम्ही शुद्ध भक्तिभावाने परमार्थ केला नाही तर तो व्यर्थ शीणच ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात सर्व माहीत असूनदेखील हे लोक विचार दृष्टीने आंधळे होतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग