वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

अवघी भूते साम्या आली

🙏 3. संत तुकाराम · ABH-078922 · अभंग क्र. १०११

1011.
अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती ॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥धृपद॥
माझी कोणी न धरो शंका । ऐसे हो का निर्द्वंव्द ॥२॥
तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥३॥

अर्थ :
देवा सर्वत्र तुझे साम्य रूप आहे म्हणजे सर्वत्र तूच आहे असे मला माझ्या ज्ञानदृष्टीने केव्हा पाहता येईल ? असे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला या पांडुरंग रायाची माझ्यावर कृपा झाली आहे असा विश्वास मला येईल. माझी कोणाला भयही वाटू नये आणि माझ्याविषयी कोणी शंकाही धरू नये. माझा कोणाशी शत्रुत्व किंवा मित्रत्व कोणत्याही प्रकारचा संबंध असू नये असा भेद विरहित देवा तु मला कर. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला जे कोणी भेटेल ते सगळे माझेच स्वरूप आहे असे मला वाटावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग