सगुण निर्गुण बुंथींच
597.
सगुण निर्गुण बुंथींचे आवरण । ब्रह्मा सनातन पंढरीये ॥१॥
तो हा श्रीहरीं नंदाचा खिल्लरी । योगी चराचरी ध्याती जया ॥२॥
शिवाचें जेंध्येय मुनिजनांचे ध्यान । ब्रह्मा परिपूर्ण पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी अठरां निराळा । लाविलासे चाळा सहां चहुसी ॥४॥
