उभा विटेवरी । कट धरु
620.
उभा विटेवरी । कट धरुनिया करी । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥
जाऊ तया ठाया । आनंद तेणे काया । वैष्णवांचिया पायां॥लोटागंणी ॥२॥
कर्मोकर्म नाही वाद । भेदभ्रम नाही भेद । वैष्णवंचा छंद । नाम गाती आनंदे ॥३॥
सुख अनुपम्य अभेदें । एका जनार्दनी छंदे । गाता नाचतां आल्हादे । प्रेम जोडे ॥४॥
