रामनामाची धन्य ख्यात
763.
रामनामाची धन्य ख्याती । पापी तरले पुढे तरती ॥१॥
तरला कोळी अजामेळ । गणिका आणि ते सकळ ॥२॥
नामे पावन स्त्रियादी याती । नामे सर्वा एकचि मुक्ति ॥३॥
एका जनार्दनी शरण । नामे तिही लोकी पावन ॥४॥