जोगवा ३९३५
3935.
जोगवा ३९३५
अनादी निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासुर मर्दनालागुनी । त्रिविधतापाची करायाझाडणी । भक्ता लागोनी पावसीं निर्वाणीं ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळमी घालीन । हाती बोधाचा झेंडा मीघेईन । भेदरहितवारीस जाईन॥२॥नवविध भक्तिच्या नवरात्रा । करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भावअंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥३॥ पुर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीनदरडी । मनोविकार करीन कुर्वडी । अद्भुत रसाचीभरीन दुरडी ॥४॥ आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग । कामक्रोध हेझोडीयले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ ऐसा जोगवा मागुनी ठेवीला । जाऊनी महाद्वारीनवस फे डिला । एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
