वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 18. आराधना (गुरुकुल आश्रम जिंतूर) › 1. आराधना (गुरुकुल आश्रम जिंतूर) › २. भाग २ आराधना (गुरुकुल आश्रम जिंतूर) › १९. प्रसाद

प्रसाद

🙏 18. आराधना (गुरुकुल आश्रम जिंतूर) · ABH-074155 · अभंग क्र. १

प्रसाद
हा अभंग आरतीनंतर देवाला मनोभावे प्रसाद आणि सद्बुद्धी मागण्यासाठी गायला जातो.
ध्रुवपद:

प्रसाद हा मज द्यावा देवा ।
सहवास तुझाच घडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा देवा ॥धृ ॥

चरण:

निशीदिनी तव मि नाम स्मरावे ।
विसर तुझाच न पडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा देवा ॥१ ॥

हृदय मंदिरी त्वा बैसोनी ।
ज्ञानयोग मज द्यावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा देवा ॥२ ॥

हरिभजनामृत निशीदिनी पाजुनी ।
जन्ममृत्यु चुकवावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा देवा ॥३ ॥

आत्म सौख्य हरी प्रसाद द्यावा ।
वियोग न च मज व्हावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा देवा ॥४ ॥

सहवास तुझाच घडावा देवा । प्रसाद हा मज द्यावा देवा ॥५ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग