वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 126. विरहिणी

कृष्ण अनुरागे रंगली

🙏 4. संत नामदेव · ABH-083536 · अभंग क्र. २८४

284.
कृष्ण अनुरागे रंगली कामिनी | कामधामे गेली घरा विसरोनी ॥१॥
होती बहुत जन्मे वियोगे शिणली | आप नाठवे पर सुखे मिनली ॥२॥
मने करुनिया जाये विषयांचे संकल्प | तंव ते अवघे होय कृष्णरूप ॥३॥
दृष्टी देखणे जे जे आवडे | वेणू वाहे तेथे उभे देहुडे ॥४॥
सुखशयनी स्वप्नी देखे सावळा | कंठी कौस्तुभ रुळे वरी वनमाळा ॥५॥
जीवे धावुनी आलिंगी प्रीती | तव ते आर्ती होय कृष्णमूर्ति ॥६॥
देह परतोनी मागुते सांभाळी | तव स्वये सिद्ध आपण वनमाळी ॥७॥
नामया स्वामी जीवीचा जीवलगू | कृष्णसुखाचा सुखबोध अंतरंगु ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग