वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

चैतन्य है दिसे उघडेय

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075133 · अभंग क्र. ४२९

429.
चैतन्य है दिसे उघडेया डोळा ।
नयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥
मसुरांतील सूक्ष्म अनुभवे दिसे ।
तेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथ तेज ।
असे गुजगुजीत निर्मळ ते ॥३॥

अर्थ :
चैतन्य वस्तु ज्ञानरूपी डोळ्यांनी दिसते, व तो सुख सोहळा निवृत्तीनाथांनी अनुभविला. ब्रम्हारंधातील मसुराएवढ्या बिंदुचे तेज अत्यंत सूक्ष्म असले तरी योगी लोकांना त्याचा अनुभव घेता येतो. ते तेज मोहक व निर्मळ असले तरी ज्या डोळ्याला तेज दिसते त्या डोळ्याचाही डोळा जो परमात्मा तो एक निवृत्तीनाथांनाच माहीत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग