नामसंकीर्तन सदा सर्व
235.
नामसंकीर्तन सदा सर्वकाळ ।
अखंड प्रेमळ देह ज्याचे ॥१॥
तयासीच भक्ति म्हणावी निर्धार ।
जाणती उत्तर ज्ञानवंत ॥२॥
क्षण एक काळ जाऊ नेदी रिता ।
आवडी हे चित्ता पांडुरंगी ॥३॥
बहेणि म्हणे जीउ जाईल सर्वथा ।
काळ जाऊ नेदी रिता नामेविण ॥४॥
