उगेचि आता बैसेन मी म
761.
उगेचि आता बैसेन मी म्हणे ।
तव हा करणे चेष्टवितो ॥१॥
दृष्टीपुढे हा उभाचि ठाये
ऐकणे होउनी राहे श्रोत्रबिळी ॥२॥
मनही नेउनी लेपउनी ठेवी ।
चित्तासी हा गावी आपणासी ॥३॥
निळा म्हणे बाई हदयीच राहिला ।
अवघाचि रोधिला जागा येणे ॥४॥
