उतरिला माझा भार ।
762.
उतरिला माझा भार ।
येणे कैवार धरुनिया ॥१॥
आपुला आपण सोहळा करी ।
पाहिजे संसारी पुरवी ते ॥२॥
नेदि पडो उणे कोठे ।
आली संकटे निवारी ॥३॥
निळा म्हणे झाला ऋणी ।
चक्रपाणी आम्हा घरी ॥४॥
762.
उतरिला माझा भार ।
येणे कैवार धरुनिया ॥१॥
आपुला आपण सोहळा करी ।
पाहिजे संसारी पुरवी ते ॥२॥
नेदि पडो उणे कोठे ।
आली संकटे निवारी ॥३॥
निळा म्हणे झाला ऋणी ।
चक्रपाणी आम्हा घरी ॥४॥