वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

सर्वत्र समान भावयुक्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075199 · अभंग क्र. १०४

104.
सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण ।
धृति धारणा धन वर्ते जया ॥
सामान्यत्व हरि समसेज करी ।
चित्त वित्त घरी हरिपाठे ॥
आकार निराकारी त्रिपथ शेजारी ।
हरि भरोवरी घेतु विरूळा ॥
ज्ञानदेवाजिणे अवघे ज्ञान होणे ।
विज्ञानी राहाणे गुरुकृपा ॥

अर्थ :
सर्वत्र समान व भावयुक्त राहुन जर नाम घेतले तर धर्माचे धारण होते व नामधनाचा वर्षाव होतो. ह्या हरिपाठामुळे हरि सामान्य होऊन त्याच्या बरोबर सम सेज करतो म्हणजे जागृत अवस्थेत तसेच झोपेतही बरोबर राहतो व त्याचे चित्त व वित्त सगळेच हरिरुपाला प्राप्त होते. निराकारातील त्रिगुण व मायेतील जगताचा आकार ह्यांना बाजुला सारुन हरिनामात रतणारा विरळाच असतो. असे हे ज्ञान प्राप्त झाले की सहज संसाररुपी विज्ञानात राहण्याची बाधा गुरुकृपेने दुर होते असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग