सांवळिये तेजी भक्ति
105.
सांवळिये तेजी भक्ति पसु ओल ।
इंद्रिया शरण चरणजी ॥
निवालो वो माये अमृत रसने ।
रामनामपेणे वैकुंठीचे ॥
आळविता सगुण निर्गुण रुपडे ।
वचने फोडोवाडे हाता येत ।
ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज ।
निवृत्तीने गुज सांगितले ॥
अर्थ :
सावळ्या तेजामुळे मनाला भक्तीची ओल येते. तसेच इंद्रिये त्याच्या चरणावर अर्पण होतात. मी त्याच नामाच्या अमृत वाणीने शांत झालो व त्याच नामाने वैकुंठ प्राप्त केले. त्याच्या सगुण व निर्गुण रुपाला भक्तीने आळविले तेव्हा तो उघड रितीने प्राप्त झाला. निवृत्तिनाथानी मला नामज्ञानांजन घातले व गुह्य ज्ञान दिले असे माऊली सांगतात.
