वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › १३, जाते व दळण अभंग

सुंदर माझे जाते गे फ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073169 · अभंग क्र. १०५

105.
सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके । ओव्या गाऊ कवतिके तू ये रे बाळ विठ्ठला ॥१॥
जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेट गे । लाउनी पांची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला ॥२॥
सासू आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बाळ विठ्ठला ॥३॥
प्रपंच दळण दळीले पीठ ते भरिले । सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला ॥४॥
सत्वाचे आंदण ठेविले पुण्य ते वैरीले । पाप ते उतू गेले ये रे बाळ विठ्ठला ॥५॥
जनी जाते गाईल कीर्ती राहील । थोडासा लाभ होईल तू ये रे बाळ विठ्ठला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग