वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 7. धर्मग्लानी संबंधी ब्रम्हादि देवांचे क्षीराब्धीशी गमन

धर्मग्लानी संबंधी ब्

🙏 4. संत नामदेव · ABH-083501 · अभंग क्र. २१

21.
धर्मग्लानी संबंधी ब्रम्हादि देवांचे क्षीराब्धीशी गमन.

पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसी झाले ओझे त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वा । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिले कीर्तन । पळाले ब्राह्मण दैत्या भेणे ॥३॥
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय । नेत्री वाहे तोय सांगतसे ॥४॥
बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोस-वेना भार मज आता ॥५॥
ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशी ॥६॥
नामा म्हणे आताम करितील स्तुती । सावधान चित्ती परिसावे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग