श्रीराममाहात्म्य
294.
श्रीराममाहात्म्य
रामजन्म.
कुळगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा | असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥
धर्म शास्त्र ऐसे डोहळे पुसावे | त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी | कैकई सदनासी जाता जाला ॥३॥
मंचकी बैसली होती ते पापिणी | देखता नयनी पहुडली ॥४॥
सुंदरपणाचा अभिमान मनी | त्यावरी गर्भिणी नामा म्हणे ॥५॥
