चाले हे शरीर कोणाचिय
117.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नको ॥२॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्ता म्हणोनिया ॥३॥
वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥४॥
तुका म्हणे विठो भरला सबाही । तया उणे काही चराचरी ॥५॥
