वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अहंकारे देह धरी जीवद

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076141 · अभंग क्र. २३१

231.
अहंकारे देह धरी जीवदशा ।
मग तो पडे सोसा संसारिका ॥१॥
तेणेचि अंतर पडिले मुळाशी ।
मग भोग सोसी नाना योनी ॥२॥
अहंकारे वाधे स्त्री धनाचा लाभ ।
माया ते स्वयंभ वाटली त्या ॥३॥
बहेणि म्हणे याचा करावा विचार ।
आत्मज्ञान-सार सापडेल ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग