बहुरूप्या ब्राह्मणा
872.
बहुरूप्या ब्राह्मणा पडियेले मित्र | दोहीचे ते गोत्र एक जाले ॥१॥
वेश्या पतिव्रते पडियेला शेजार | दोहीचा आचार एक जाला ॥२॥
संग तोचि बाधी संग तोचि बाधी | कुसंग तो बाधी नारायण ॥३॥
नामा विष्णुदास सत्संगति बोधला | आत्मा हा लाधला पांडुरंग ॥४॥
